Photo – तेजस्वी प्रकाशचे साडीतले सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री तेजस्वी प्रकारच्या सौंदर्याबरोबरच तिच्या क्युटनेसचेही अनेक चाहते आहेत. मग ती वेस्टर्न आऊटफिटमध्ये असो किंवा साडी तिच्या सौंदर्यातून नजरा हटेनाशा झाल्या आहेत.

तेजस्वी प्रकाश केवढी स्टायलिश आणि ग्लॅमरस असल्याचे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र नुकतेच तेजस्वीने इंस्टावर शेअर केलेले फोटो जबरदस्त व्हायरल झाले आहे. तिच्या फोटोंचे चाहत्यांकडूनम दिलखुलासपणे कौतुक केले जात आहे.

तेजस्वीच्या सौंदर्यांत साडीने आणखी भर घातली आहे. गुलाबी प्लेन ब्लाऊजवर तिने हिरव्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे. तो रंग तिच्यावर उठून दिसत आहे. या लूकला तेजस्वीने सुंदर दागिन्यांनी पूर्ण केले आहे.

गळ्यात मोत्यांचा हार आणि कानात मोत्यांचे झुमके घालून तिने आपले सौंदर्य खुलवले आहे.

काहींना तेजस्वी प्रकाशच्या या लूकला दीपिका पाहुकोणसोबत कम्पेयर केले आहे. तेजस्वीने याआधीही साडी नेसून सोशल मीडियावर आग लावली होती. मात्र यावेळीचा तिचा लूक आणि अंदाज थोडा नेहमीपेक्षा वेगळा आहे.

आता सर्वांना तिच्या या फोटोंवर करण कुंद्राच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. सध्या करण तेजस्वीसोबत तिच्या चाहत्यांनाही वाट पाहायला लावत आहे. तेजस्वी करणसोबत आपली तारीफ ऐकण्यासाठी वाट पाहत आहे.