हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा ‘हा’ अभिनेता, आता लक्झरी गाड्यातून फिरतो

2716

‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’, ‘जॉली एलएलबी’ आणि ‘संजू’ यासारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलेल्या बोमन ईराणी यांनी नुकताच साठीमध्ये प्रवेश केला आहे. 2 डिसेंबर, 1959 ला मुंबईत जन्म झालेल्या ईराणी यांचा सोमवारी साठावा वाढदिवस होता. आज लाखांच्या गाड्यांमध्ये आणि आलिषान घरामध्ये राहात असणाऱ्या बोमन ईराणी यांचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायक असाच आहे.

बोमन ईराणी यांनी वयाच्या 42 व्या वर्षी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. या वयात त्यांची इंडस्ट्रीत एन्ट्री केल्याने अर्थातच त्यांना साईड रोड मिळू लागले. परंतु साईड रोल करताना देखील त्यांनी आपली एक वेगळी छाप चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये पाडली. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी हॉटेल, बेकरीमध्ये काम केलेले आहे, तसेच फोटोग्राफीही केलेली आहे.

boman-irani1

बोमन ईराणी यांना फोटोग्राफीचा छंद आहे. 12 वी मध्ये शिकत असताना त्यांनी क्रिकेट लढतींचे फोटो काढण्यास सुरुवात केली आणि याचे त्यांना थोडेफार पैसेही मिळत असत. छंदही जपला जात होता आणि खिशाला आधारही मिळत होता. त्यानंतर पुण्यात झालेल्या बाईक रेसमध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रोफेशनल फोटोग्राफी केली. त्यानंतर मुंबईत झालेल्या बॉक्सिंग वर्ल्डकप कव्हर करण्याची संधी त्यांना मिळाली.

boman-irani

मुंबईतील मीठीबाई कॉलेजमध्ये ग्रॅज्यूएशनपर्यंतचे शिक्षण बोमन ईराणी यांनी घेतले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ऐतिहासिक ताज हॉटेलमध्ये 2 वर्ष वेटर आणि रूम सर्व्हीसचे काम केले. काही कारणास्तव त्यांना हे काम सोडावे लागले आणि नंतर आपल्या आईसोबत बेकरीमध्ये त्यांनी जवळपास 14 वर्ष काम केले. अॅक्टिंगचा किडा असणाऱ्या बोमन ईराणी यांची भेट एक दिवस कोरिओग्राफर श्यामक डावर यांच्याशी झाली आणि त्यांनी ईराणी यांना थिएटर करण्याचा सल्ला दिला.

boman-irani3

बोमन ईराणी यांना जास्त करून कॉमेडी भूमिका मिळायच्या. थिएटर करता करता त्यांनी चित्रपट नगरीमध्ये देखील ओळख बनवली. अखेर मोठ्या संघर्षानंतर 2001 साली त्यांना ‘एव्हरी बडी सेज आय एम फाइन’ आणि ‘लेट्स टॉक’ या इंग्रजी चित्रपटात भूमिका मिळाली. त्यानंतर 2003 मध्ये आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले.

boman-irani4

बोमन ईराणी यांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘हनीमून ट्रैवेल्स प्राइवेट लिमिटेड’, ‘दोस्ताना’, ‘युवराज’, ‘थ्री इडियट्स’, ‘तीन पत्ती’, ‘हम तुम और घोस्ट’, ‘हाउसफुल’, ‘हाउसफुल 2’ आणि ‘संजू’ या चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या