मराठ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मुकुंद मराठे 

पुस्तकाच्या नावाप्रमाणे मराठय़ांचा वैशिष्टय़पूर्ण इतिहास, एकत्रित, समग्र पद्धतीने देण्याचा स्तुत्य व अभ्यासपूर्ण प्रयत्न लेखकाने केला आहे. मराठय़ांच्या इतिहासाविषयी मान्यवरांनी लिहिलेली बरीच पुस्तके आहेत. पण ती पुस्तके एका ठरावीक कालखंडाविषयी किंवा एखाद्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आहेत, जसे की रणजीत देसाईंची ‘स्वामी’ ही कादंबरी, ना. स. इनामदारांची ‘शहेनशहा’, ‘छावा’, ‘मंत्रावेगळा’ इत्यादी इत्यादी.

मात्र इसवी सन 1294 ते 1947 या काळातील मराठय़ांच्या इतिहासाला कवेत घेऊ पाहणारे हे पुस्तक इतिहासप्रेमींना आणि अभ्यासू वाचकांना आवडेल असेच आहे.

मराठेशाही आणि पेशवेशाहीचे साक्षेपी कथन त्यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱयात बसून निसटले नसावेत, तर पेटाऱयाला खांदा देणाऱया भोयांच्या वेषात निसटले असावेत, असे तर्काधिष्ठाrत विधान लेखक करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू गुढघी रोगाने झाला नसावा, तर काही अन्य कारणाने झाला असावा असेही मत लेखक नोंदवतो. मराठेशाहीतील इतर सरदार घराणी, उदाहरणार्थ तंजावरचे भोसले, कागलकर घाटगे, घोरपडे घराणे, इंदोरचे होळकर घराणे, बडोदेकर गायकवाड, नागपूरकर भोसले, घार देवासचे पवार घराणे आणि महत्त्वाच्या तहांची माहिती दिल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.

पुस्तकाच्या शेवटी भोसले घराण्याची वंशावळ तपशीलवारपणे दिली आहे. या तपशिलात बरीच अचूकता आहे आणि मराठेशाहीतील घटनांना तारीखवार वर्णन केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही.

 शिक्केकट्यारी, मराठ्यांचा वैशिष्टय़पूर्ण इतिहास

लेखक ः महेश श्री. गुप्ते

प्रकाशक ः व्यास क्रिएशन्स

पृष्ठs ः 236, मूल्य ः रुपये 300/-