
सामना ऑनलाईन, ठाणे
ठाण्याजवळ असलेल्या कळव्यामध्ये एका घरावर दरड कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यामध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. विरेंद्र जसवार असे वडिलांचे नाव आहे तर सनी जसवार असे मुलाचे नाव आहे. विरेंद्र जसवार यांची पत्नी या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली असून तिला कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होू नये म्हणून आदर्शनगर या परिसरातील 70 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.






























































