
वाराणसीतील नमो घाटावर संतापजनक घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक वादातून बाऊन्सर्सनी चार पर्यटकांना हॉकी स्टिक्स आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे चार मित्र गंभीर जखमी आहेत. राजेश उर्फ चिंटू जयस्वाल असे मयत पर्यटकाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, राजेश आणि त्याचे चार मित्र सोनभद्रहून वाराणसीला आले होते. पहाटे लवकर आल्यावरून आणि नमो घाटात प्रवेश करण्यावरून पर्यटक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि बाऊन्सर्समध्ये पाचही पर्यटकांना हॉकी स्टिक्स, सळ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात राजेशचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चौघे गंभीर जखमी झाले.
राजेश हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता आणि भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तक्रारीनंतर, पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.



























































