
देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू विजेंदर सिंग याने शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी त्याने सरकारने जर कृषी कायदा मागे घेतला नाही तर तो त्याचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करेल असा इशारा त्याने सरकारला दिला आहे.
रविवारी पंजाबमधील पाच खेळाडूंनी सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनाला भेट देत त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. यात अर्जुन पुरस्कार विजेते राजबीर कौर, गुरमाल सिंग, माजी कुस्तीपटू कर्तार सिंग, माजी बॉक्सर जयपाल सिंग, ध्यान चंद पुस्कार विजेते अजित सिंग यांचा समावेश आहे.
‘बऱ्याच खेळाडू जे इथे येऊ शकले नाही त्यांनी त्यांचे पुरस्कार माझ्याकडे दिले आहेत. जर हा कायदा परत घेतला नाही तर आम्ही आमचे पुरस्कार परत करू. त्यासाठी आम्ही राष्ट्रपतींची वेळ मागतोय. जर आम्हाला त्यांची वेळ मिळाली नाही तर आम्ही हे पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवू’, असे राजबीर कौर यांनी सांगितले.



























































