ब्राझीलच्या ‘मिस बंबम’ विजेतीला आठ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा; अंमली पदार्थांच्या तस्करीत दोषी

ब्राझीलमधील ‘मिस बंबम’ विजेती फ्लाव्हिया तमायो हिला गेल्या वर्षी अंमली पदार्थांच्या तस्करी आणि वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ती दोषी आढळल्याने तिला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फ्लाव्हिया तमायो ही पामेला पॅन्टेरा या नावानेही ओळखली जाते. प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर तिचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते. गेल्या वर्षी हॉटेलमध्ये तिला अटक करायला गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर तिने कपडे उतरवून गोंधळ घातला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

फ्लाव्हिया तमायोने 2018 मध्ये ‘मिस बंबम’ सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तसेच प्लेबॉयच्या मुखपृष्ठावरही ती झळकली होती. गेल्यावर्षी तिला अटक करायला गेलेल्या साध्या वेषातील पोलीस अधिकाऱ्यांसमोर कपडे उतरवत गोंधळ घातल्याने ती चर्चेत आली होती. या घटनांमुळे चर्चेत असलेल्या तमायोला अंमली पदार्थ तस्करी आणि वेश्याव्यवसायप्रकरणी आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फ्लॅव्हिया तमायोला गेल्या वर्षी ब्राझीलच्या एस्पिरिटो सॅंटो राज्यात अटक झाल्यानंतर ड्रग्स आणि वेश्या व्यवसाय प्रकरणी तिच्याविरोधात सुनावणी सुरू होती. त्यात ती दोषी आढळली असून तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तमायो तिच्या साथीदारांसह कोकेन आणि इंतर अंमली पदार्थांचे वितरण आणि विक्री करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. ती आणि तिचे साथीदार फेडरल डिस्ट्रिक्टमधील श्रीमंत ग्राहकांना ड्रग्स विकत होते. त्यासाठी ग्राहकांनी 500 ते 1000 ब्राझिलियन रिअल दिल्याचे तपासत उघड झाले आहे.

5 जून 2020 रोजी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना मोठ्या प्रमाणात कोकेन, बंदुक आणि दारूगोळा आढळला होता. तो त्यांनी जप्त केला होता.तमायो आणि तिच्या साथीदारांकडून चालण्यात येणाऱ्या वेश्या व्यवसायाद्वारे श्रीमंत ग्राहकांना हेरून त्यांना अमंली पदार्थ पुरवण्यात येत होते, असेही तपासात आढळून आले आहे. गेल्या वर्षी तिला अटक करण्यात आली तेव्हा तिला अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी वापरला जाणारा गांजा आणि काही बिले सापडली होती. तिने वेश्याव्यवसाय आणि मादक पदार्थांच्या विक्रीसाठी पॅकेज तयार केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. ब्राझीलमध्ये वेश्याव्यवसाय बेकायदा नाही. मात्र, वेश्याव्यवसायाद्वारे अंमली पदार्थांच्या तस्करीत ती दोषी आढळली आहे. तमायोला या शिक्षेविरोधात अपील करता येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या