
दूध, पेट्रोल डिझेल यांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आधीच खिशाला महागाईची मोठी झळ बसलेली असताना ब्रेडच्या किंमतीत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. ब्रेडच्या एका पॅकेटच्या किंमतीवर कंपनीने थेट पाच रुपयांची दरवाढ केली आहे.
मॉर्डन, ब्रिटानिया, विब्स यां कंपनीने ही दरवाढ लागू केल्याचे समजते. वाहतूक खर्च, पॅकेजिंग खर्च, कच्चा माल यांचा खर्च वाढल्याने ब्रेड कंपन्यांनी ब्रेडच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता मॉर्डनच्या सफेद ब्रेडच्या पॅकेटची किंमत 40 वरून 45 झाली आहे. तर व्होल व्हिट ब्रेडची किंमत 55 वरून 60 झाली आहे तर मल्टिग्रेन ब्रेडची किंमत 60 वरून 65 वर पोहोचली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
सँडविचचेही दर वाढणार?
आधीच दूधाचे दर वाढल्यामुळे दुधामुळे तयार होणाऱ्या चीझ बटर यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यात आता ब्रेडही महागल्याने सँडविचचे दरदेखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




























































