Breaking – ‘या’ मुद्द्यांवर झाली पंतप्रधान मोदींशी चर्चा

2607
uddhavji modiji
या भेटीत राज्याच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत देखील भेटीतील मुद्दे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाच राज्य आहे. तेव्हा राज्यासाठी ज्या आवश्यकता, प्रश्न आहेत त्यासंदर्भात चर्चा केली. त्यावर पंतप्रधान मोदींनी राज्याच्या विकासासाठीचे जे प्रकल्प आहेत त्यात संपूर्ण सहकार्य देणार असल्याचे वचन, आश्वासन दिले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

या भेटीत जीएसटी, पंतप्रधान पीक विमा योजना, केंद्रीय रस्ते विकास निधी, बळीराजा संजीवनी योजना पेंडिंग प्रपोजल, पीएमसी बँक या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली.

आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पर्यावरणाविषयी चर्चा केली. याच दृष्टीने इलेक्ट्रीक वाहतूक, अक्षय ऊर्जा, महामार्गावर सौरऊर्जा, पुनर्वापर होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकवर बॅन, असे विषय देखील त्यांनी मांडले. तसेच महाराष्ट्रातील शहरात जंगल निर्मितीच्या प्रयोगासंदर्भात देखील ते बोलल्याचे त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या