
समाजवादी पार्टीचे संस्थापक व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मुलायम सिंह यादव यांचे पुत्र अखिलेश सिंह यादव यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
मेरे आदरणीय पिता जी और सबके नेता जी नहीं रहे – श्री अखिलेश यादव
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 10, 2022
समाजवादी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात गेल्या आठवड्याभरापासून उपचार सुरू होते. सोमवारी डॉक्टरांनी त्यांचे मे़डिकल बुलेटिन जारी करत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती दिली होती. अखेर आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



























































