30 हजाराची लाच स्वीकारली; ग्रामसेवक, महिला सरपंचासह पती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

उदगीर तालुक्यातील हाळी येथील ग्रामसेवक महिला सरपंच आणि महिला सरपंचाचे पती अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 30 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. शौचालयाच्या केलेल्या कामाच्या बिलासाठी ही लाच मागण्यात आली होती.

तक्रारदार यांनी मौजे हाळी ग्रामपंचायत अंतर्गत अल्पसंख्यांक बाहूल योजनेअंतर्गत हाळी गावांत केलेल्या शौचालयाच्या कामाचे बिलाचा 3,65,000 रूपायांचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच व सरपंच बाईचा पती यांनी बिलाच्या 10% प्रमाणे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ग्रामसेवक व सरपंच यांनी प्रत्येकी 15,000/- रुपये असे एकुण 30,000/- रुपये घेण्याचे मान्य करून, सदर लाचेची रक्कम ग्रामसेवक व सरपंच यांनी प्रत्येकी 15,000/- रुपये अशी एकुण 30,000/- रु स्वीकारली. या प्रकरणी ग्रामसेवक परशुराम पंढरीनाथ गायकवाड (वय-45 वर्षे, रा शाहू कॉलनी, थोडगा रोड, अहमदपूर, जि.लातूर), महिला सरपंच प्रझा दयानंद कांबळे (वय-36 वर्षे, रा.भिमनगर, अहिल्याबाई होळकर चौक, हाळी, ता.उदगीर जि. लातूर) आणि सरपंच बाईचा पती दयानंद गोविंदराव कांबळे (वय-53 वर्षे, रा. भिमनगर, अहिल्याबाई होळकर चौक, हाळी, ता.उदगीर जि. लातूर) या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.