
पेन्शनची फाईल पूर्ण करून देण्यासाठी दारू आणि मटणाची पार्टी हवी म्हणून त्यासाठी 2500 रुपयाची लाच स्विकारणारा प्राचार्य राजेंद्र गिरी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्राचार्य राजेंद्र नेपाळबुवा गिरी (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड) यांनी चार महिन्याचा पगार काढण्यासाठी त्याचप्रमाणे पेन्शन ची फाईल नागपूर येथील कार्यालयात पडताळणी करिता पासवर्ड देऊन पाठवण्यासाठी दारू आणि मटणाची पार्टी द्यावी लागेल. त्यासाठी 2500 रुपये द्यावेत म्हणून लाचेची मागणी केली व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था लातूर येथे लाचेची रक्कम स्वतः स्विकारली. सदरची रक्कम स्विकारल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात ते अडकले आणि त्यांना अटक करण्यात आली.






























































