
ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेसाठी जोहान्सबर्ग येथे एकत्र आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील अनिर्णित बाबींविषयी चर्चा झाली असून मोदी यांनी या बाबींबद्दल जिनपिंग यांच्याकडे हिंदुस्थानची भूमिका मांडली, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी येथे सांगितले. सीमा भागात शांतता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करतानाच मोदी यांनी उभय देशांमधील संबंध सुधारण्यासाठी नियंत्रण रेषेचा आदर आणि सन्मान राखणे अत्यावश्यक असल्याचे जिनपिंग यांना सांगितल्याची माहिती क्वात्रा यांनी दिली. दरम्यान, पूर्व लडाखमधील डेपसँग पठारी भाग आणि डेमचोक येथे मात्र सैन्यमाघार झालेली नाही.



























































