ब्रिजस्टोन इंडियाच्या ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात 23 जुलैपासून होणार आहे. याप्रसंगी ब्रिजस्टोन इंडियाकडून या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात सहभागी होणाऱया हिंदुस्थानी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी या कंपनीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व ऑलिम्पिक पथकाचे सदस्य मेरी कोम, पी.व्ही. सिंधू व उदयन माने यांची उपस्थिती होती.

या वेळी ब्रिजस्टोन इंडियाकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी ‘चेस युअर ड्रीम’ (स्वप्नांचा पाठलाग करा) हे कॅम्पेन राबवले. यासाठी मेरी कोम व पी.व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंची निवडही केली. या दोन्ही खेळाडूंनी ब्रिजस्टोन इंडियाने उचललेल्या या पावलाचे काैतुकही केले.