नात्याची चकली, मुलीच्या माजी प्रियकराच्या प्रेमात तिचा बापही पडला

2565

इंग्लंडमध्ये एका व्यक्तीचं त्याच्या मुलीच्या माजी प्रियकरवर प्रेम जडलं. हा तरूण त्याच्या माजी प्रेयसीसोबत आणि तिच्या वडिलांसोबत फिरायला गेला होता. तिथे मुलीच्या बापाने ‘तू मला आवडतोस’ असं म्हणत आपल्या प्रेमाची कबुली दिली. बॅरी ड्रूईट बॅरलो (50 वर्षे) असे तरुणीच्या पित्याचे नाव आहे. बॅरी हा इंग्लंडमधील नोंदणीकृत समलिंगी पिता आहे. बॅरी मॅनचेस्टर इथे राहात असून त्याला स्कॉट हचिंसन प्रचंड आवडायला लागला होता. स्कॉट हा बॅरीचा सहकारी असल्याचे कळते आहे.

स्कॉट हा बायसेक्शुअल आहे. त्याचे बॅरीच्या मुलीसोबोत प्रेमसंबंध होते. बॅरीची मुलगी सॅफरॉन ही 20 वर्षांची असून ती आणि स्कॉट काही महिन्यांपूर्वी वेगळे झाले होते. मुलीपासून वेगळ्या झालेला स्कॉट बॅरीला आवडायला लागला होता. त्याने गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामवर पोस्ट करत जाहीर केलं होतं की आता तो स्कॉटसोबत रिलेशनमध्ये आहे. त्याने स्कॉटला प्रेमाची मागणी घालत असतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. बॅरी, स्कॉट आणि बॅरीची मुलगी सॅफरॉन फिरायला गेले असताना बॅरीने स्कॉटला मागणी घातली होती.

कोएशियातील एका बेटावर हे तिघे फिरायला गेले होते. एका यॉटवर फिरायला गेले असताना बॅरीने स्कॉटसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी बोट मेणबत्त्या आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवण्यात आली होती. वडील आणि माजी प्रियकराच्या प्रेमसंबंधाबाबत सॅफरॉनने आपल्याला कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलंय. ते दोघे खूश आहेत आणि मला त्यांच्या नात्याबद्दल हरकत नाही असं तिने म्हटलंय.

बॅरी आणि त्याचा नवरा टोनी हे 1999 साली प्रकाशझोतात आले होते. या दोघांनी समलिंगी जोडपं म्हणून पालक नोंदणी केली होती. यानंतर त्यांनी सरोगसीद्वारे एस्पेन आणि सॅफरॉन यां दोन जुळ्यांना जन्म दिला होता. बॅरीचं म्हणणं आहे की त्याला आजही टोनी आवडतो, तो त्याचं खरं प्रेम आहे मात्र त्यांचं 32 वर्ष जुनं नातं आता तुटलं आहे. 2008 साली टोनीला कॅन्सर झाला होता. त्यानंतर त्याच्यात आणि बॅरीमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली. 2018 साली टोनी रुग्णालयात असताना बॅरीला आधाराची गरज भासायला लागली होती. त्यावेळी त्याच्या आयुष्यात स्कॉटचे आगमन झाले होते. बॅरी आणि स्कॉटने आता सरोगसीद्वारे एका बाळाला जन्म द्यायचेही ठरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या