
रहदारीच्या ठिकाणी एका चौकात एक जोडपे चक्क सेक्स करत असल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात लोकांना त्या दोघांचा तो भयंकर प्रकार पाहून लाज वाटत असल्याचेही स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या जोडप्याचा शोध सुरू केला व त्यांना अटक केली.
हा प्रकार घडला आहे ब्रिटनच्या लिव्हरपूल शहरात. जो फिरबी व केली कजिन्स असे त्या प्रियकर प्रियसीचे नाव असून सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याच कपलचे आणखी काही व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात कधी ते मर्सीरेल ट्रेनमध्ये तर कधी मेट्रो स्थान आक्षेपार्ह स्थितीत अश्लील चाळे करताना दिसत आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शहराच्या महापौरांनी देखील या व्हिडीओची गंभीर दखल घेत त्या दोघांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना या जोडप्याचे आणखी काही अश्लील व्हिडीओ असल्याचेही दिसले. पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजेच 5 ऑगस्टला केलीला अटक केली. केली ही 35 वर्षांची असून तिचे 23 वर्षांच्या फिरबीसोबत प्रेमप्रकरण आहे. केलीच्या अटकेनंतर 8 ऑगस्टला पोलिसांनी फिरबीला अटक केली,.


























































