पाकिस्तानशी लढताना बीएसएफचे जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जवान जखमी

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले आहेत. जम्मू कश्मीरच्या आर एस पुरा भागात हा गोळीबार झाला असून त्यात जवान मोहम्मद इम्तियाज हे शहीद झाले आहेत.

बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तानशी लढताना उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांना वीरमरण आले आहे. इतर सात जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद इम्तियाज हे बिहारच्या छपरा जिल्ह्यातील नारायणपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.