
बीएसएफचे अधिकारी ध्रुव प्रसाद यांची जोधपूरला बदली झाली. त्यानंतर बदलीच्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी त्यांनी दिल्ली ते जोधपूर असा प्रवास सायकलवरून केला. राजस्थान प्रैंटियरचे सहाय्यक कमांडंट असलेल्या ध्रुव प्रसाद यांनी जोधपूरला डय़ुटी जॉईन करताना ट्रेन किंवा कारचा पर्याय न वापरता सायकलचा पर्याय स्वीकारला. ते पाच दिवसांत 608 किलोमीटर सायकल चालवत जोधपूरला पोचले. त्यांनी प्रत्येक दिवशी सरासरी 130 किमी सायकल चालवली. ग्रीन एनर्जीचा संदेश देणे हा उद्देश.
ध्रुव प्रसाद यांनी सायकलिंग करताना दिल्ली, हरयाणा, राजस्थान येथून प्रवास केला. दिवसाला 8 ते 12 तास सायकल चालवली. जीपीएस यंत्रणेद्वारे रस्ते शोधून प्रवास पूर्ण केला. या प्रवासामुळे 130 किलो कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन टळले.
सायकलिंग म्हणजे व्यायाम
रोजच्या जीवनात कार्बन उर्त्सजन कमी करायचे असेल तर सायकल हा चांगला पर्याय आहे. सायकलिंग करणे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी फायदेशीर आहे. सायकलिंग हा महत्त्वपूर्ण व्यायाम आहे, अशा भावना ध्रुव प्रसाद यांनी व्यक्त केल्या.