- करदात्यांची मोठी निराशा, कररचना ‘जैसे थे’. आयकरात कोणताही बदल नाही, सहा वर्षांपासून कोणताही बदल नाही.
अर्थ संकल्प 2022#unionbudget #india #BudgetBytes #Budget2022 #Budget #digitalrupee #Digital pic.twitter.com/VGKBswL484
— Saamana (@SaamanaOnline) February 1, 2022
- आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 16 लाख लोकांना नोकरी देणार. मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार – निर्मला सीतारामन
- डिजीटल बँकिंग देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे प्रयत्न. बँकांमध्ये ज्या सुविधा मिळातात त्या पोस्टात देण्याचा प्रयत्न करणार – निर्मला सीतारामन
अर्थ संकल्प 2022#unionbudget #india #BudgetBytes #Budget2022 #Budget #taxes #corporatetax #incometax pic.twitter.com/lNCJy5XEvu
— Saamana (@SaamanaOnline) February 1, 2022
- विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते 12 वीसाठी चॅनेल सुरू करणार असून त्याची संख्या 12 वरुन 200 पर्यंत वाढवणार. देशात देशिक भाषांमध्ये डिजीटल विद्यापीठ सुरू करणार. – सीतारामन
- गंगानदी किनाऱ्यापासून 5 किलोमीटर चौरस भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या विकासाचे उद्दिष्ट. संपूर्ण देशात रसायनमुक्त शेतीला चालना देणार – निर्मला सीतारामन
अर्थ संकल्प 2022#unionbudget #india #BudgetBytes #Budget2022 #Budget pic.twitter.com/OA4xhB1jwc
— Saamana (@SaamanaOnline) February 1, 2022
- पुढील 3 वर्षात 400 ‘वंदे भारत’ रेल्वे चालवण्याचे उद्दिष्ट. तसेच 3 वर्षात 100 पीएम वेगाने चालणारे कार्गो टर्मिनल विकसीत करणार – निर्मला सीतारामन
- चालू वित्तीय वर्षात (2022-23) देशाचा जीडीपी ग्रोथ (GDP Growth) 9.2 टक्के राहण्याचा अंदाज – निर्मला सीतारामन
हिंदुस्थानला एका नव्या व्हिजनची आवश्यकता आहे. निर्मिती आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांपुरतेच आपले विचार सरकारने मर्यादित ठेवू नयेत – रघुराम राजन, माजी गव्हर्नर, आरबीआय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या प्रत्येक क्षेत्राच्या गरजांनुसार एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करतील. यातून सगळ्यांनाच लाभ होईल. शेतकऱ्यांसहीत सर्व क्षेत्रांना या अर्थसंकल्पातून अपेक्षा आहेत – पंकज चौधरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या
कोरोना संकटामुळे दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या महागाई आणि बेरोजगारीसारख्या आव्हानांना सामोरे जाण्याचा सीतारामन यांचा प्रयत्न
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने एक लाखापर्यंत कर्ज देण्याची घोषणा होण्याची शक्यता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला सलग चौथा अर्थसंकल्प लोकसभेत आज, मंगळवारी (1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता सादर करणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, 1 फेब्रुवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प करणार सादर





























































