लग्नाचं वचन देऊन अभिनेत्रीवर बलात्कार, बिल्डरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाचं वचन देऊन अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका बिल्डरला अटक करण्यात आली आहे. या बिल्डरचं नाव आदित्य अजय कपूर असं आहे. त्याच्यावर लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा पीडितेला वांद्र्यातील एका मित्राच्या घरी भेटला होता. पीडिता ही अभिनेत्री असून तिने काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ही भेट झाल्यानंतर त्यांनी फोन नंबरही शेअर केले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या सतत संपर्कात होते. हळूहळू त्यांच्याच जवळीक वाढली. आदित्यने पीडितेला लग्नाचं वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला.

आदित्य याने कफ परेड येथील आपल्या घरी तसंच गोवा येथे तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने त्याला लग्नासाठी विचारलं तेव्हा देखील त्याने आपल्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. जेव्हा तिने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली. तसंच त्याने पीडितेच्या आई वडिलांच्या फोनवरही अश्लील मेसेज केले आणि तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीला वैतागून पीडितेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आदित्य अजय कपूर याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.