बनावट कागदपत्रे बनवून एका बांधकाम व्यावसायिकाने 13 कोटी 65 लाख रुपयांचा झोल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या अन्य सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक विरा हे सिवानी रिअॅल्टी प्रा. लि. या गृहप्रकल्पाचे विकासक, प्रवर्तक व भागधारक असताना त्यांनी सदरचा गृहप्रकल्प पूर्ण केला नाही. तसेच इतर सहकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केली अशी तक्रार कश्यप मेहता यांनी पोलिसांत केली.