
सामना ऑनलाईन । नोएडा
नोएडामधील सेक्टर 31 येथील निठारी गावात दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून इमारतीच्या ढिगार्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Noida: Two injured and many feared trapped after a two storey building collapsed in Nithari village, Sector-31. pic.twitter.com/cvcpPO6iOa
— ANI UP (@ANINewsUP) January 14, 2019
इमारत कोसळल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही काळासाठी तिथे धावपळही झाली होती. काही वेळानंतर पोलीस आल्यावर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी ढिगारे उचलण्यास सुरूवात केली.
सदर इमारत अतिशय जुनी असून तीची अवस्था वाईट होती. घटनास्थाळी ढिगारे काढून फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्यात दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून अनेकजण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.


























































