
अजिंठा या राष्ट्रीय महामार्गावरील जालना जिल्हा व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर मढ फाट्याजवळ असलेल्या महानुभाव आश्रमसमोर मंगळवार 14 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गिट्टी घेऊन जाणार्या भरधाव टिप्परने समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात तिघे ठार झाले. अपघातातील दोन मृत हे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील असून, एक मृत हा बुलढाणा जिल्ह्यातील कोलवडचा आहे. गिट्टीची वाहतुक करणारा टिप्पर (एमएच-28-बी-7594) चालक राहुल गेंदालाल बारेला (रा. चिंचखेड बु, मुक्ताईनगर) हा दहीदकडे जात असताना दुचाकी (एमएच-20-सीडी-0730) ला त्याच्या वाहनाची जबर धडक बसली.
या अपघातात दुचाकीवरील ज्ञानेश्वर सुरुशे (रा. पानवडोद ता. सिल्लोड जि. संभाजीनगर), वरद अंनता वैद्य (7, रा. कोलवड), अमर रामेश्वर जाधव (13, रा. पानवडोद ता. सिल्लोड जि. संभाजीनगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर वनिता ज्ञानेश्वर सुरुशे (35, रा. पानवडोद ता. सिल्लोड जि. संभाजीनगर) या महिलेला उपचारासाठी बुलढाणा येथे उपचार करुन पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

























































