
बल्गेरियात भ्रष्टाचार, आर्थिक धोरणे आणि राजकीय अस्थिरतेमुळे देशभरात संतापाची लाट उसळती आहे. बल्गेरियाची सोफियासह अनेक शहरांमध्ये काल रात्री हजारो लोक रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध निदर्शने करत होते. वर्षानुवर्षे रुजलेल्या भ्रष्टाचारावर कोणतेही सरकार नियंत्रण मिळवू शकले नाही, असा लोकांचा आरोप आहे.
यातच बल्गेरियाचे पंतप्रधान रोसेन झेल्याझकोव्ह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावावर मतदान सुरू होण्याच्या काही मिनिटांआधीच त्यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
गेल्या चार वर्षांत बल्गेरियाने सात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आहेत. १ जानेवारी रोजी बल्गेरिया युरो झोनमध्ये सामील होणार होता. मात्र याआधीच राजकीय गोंधळामुळे नवीन अनिश्चितता निर्माण झाली आहे.























































