
कल्याणजवळील मोहोली–बल्याणी परिसरात मोठी कारवाई करत पालिकेने अनधिकृत चाळींवर बुलडोझर चालवला. या कारवाईत तब्बल ४०० हून अधिक अनधिकृत चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि चाळमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
मोहोली आणि बल्याणी परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर चाळी उभारण्याचा सपाटा सुरू होता. नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या या चाळींमुळे संपूर्ण परिसर बकाल होत चालला होता. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने कठोर भूमिका घेत महसूल विभाग आणि पोलिसांच्या बंदोबस्तात मोठी कारवाई हाती घेतली.
जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



























































