
स्पेनला फिफा विश्वचषक अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया 19 वर्षीय लॅमिन यमालच्या घरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फ्रान्सविरुद्ध स्पेनच्या 2-0 अशा प्रभावी उपांत्य फेरीतील विजयानंतर काही तासांतच दोन चोरांनी बार्सिलोनाच्या बाहेरील यमालच्या आलिशान घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र यमालच्या खासगी सुरक्षा पथकाच्या सतर्पतेमुळे चोरांनी रिकाम्या हाताने पळ काढला.
संशयित सीसीटीव्हीमध्ये पैद
ही घटना स्पेनच्या उपांत्य फेरीतील विजयानंतर लगेचच पहाटेच्या वेळी घडली. दोन मुखवटाधारी संशयित यमालच्या मालमत्तेची सीमा भिंत चढताना दिसले. घरातील सीसीटीव्हीमुळे चोरांना शोधण्यात आले. आपण पॅमेऱयात पैद झालो आहोत हे लक्षात येताच चोरांनी काहीही न चोरता घटनास्थळावरून पळ काढला. सुरक्षा पथकाकडून माहिती मिळाल्यानंतर पॅटलान पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा शोध घेत आहेत.
बार्सिलोनाचे खेळाडू टार्गेटवर
बार्सिलोनाच्या खेळाडूंच्या घरी चोरीचा प्रयत्न वारंवार होत आहे. बार्सिलोनाचा बचावपटू पाऊ पुबार्सीच्या घरातून एक महागडे लक्झरी घडय़ाळ चोरले गेले होते, तर गोलकीपर जोन गार्सियाच्या घरातून चोरांनी रोकड आणि दागिनेही चोरले होते.






























































