लातुरात भरदिवसा घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. घरफोडी करून घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने पळवण्यात आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घराला दुसरेच कुलूप लावून गेले, त्यामुळे घराच्या मालकाला कुलूप तोडून घरात प्रवेश करावा लागला.

ही घरफोडीबाबत पुष्पा सचिन जगताप (रा. कृष्णकुंज सोसायटी, पापविनाश रोड, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बुधवारी (15 मार्च रोजी) सायंकाळी 4.30 वाजता त्या आपल्या मैत्रिणीसोबत कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दीड तासाने सायंकाळी 6 वाजता त्या घरी परत आल्या, तेव्हा घराला दुसरेच कुलूप लावल्याचे दिसून आले. कुलूप तोडून घरात गेल्यावर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाट फोडून आतील सोन्याची 5 ग्रॅमची अमेरिकन डायमंड असलेली अंगठी, 5 ग्रॅमचे सोन्याचे कानातले फुले, चांदीचे दोन पैंजण, चांदीची अंगठी, 5 जोडवे, कमरेचा छल्ला, तीन देवतांच्या मूर्ती, चांदीचा दिवा असा एकूण 65 हजाराचा मुद्देमाल पळवण्यात आला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.