जम्मू-कश्मीरमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळून 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शोपिया

जम्मू-कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी दुपारी एक मिनी बस दरीत कोसळून 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 9 मुलींचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपिया जिल्ह्यातील मुगल रोडवर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या स्कुटरला वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती खोल दरीत कोसळली. यात 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सर्व विद्यार्थ्यी कॉम्यूटर कोचिंग क्लासवरून परत येत होते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेमध्ये 7 जण जखमी झाले असून त्यांना जिल्ह्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राज्यपालांनी व्यक्त केले दु:ख
अपघाताची माहिती मिळताच जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दु:ख व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे मला अतिव दु:ख झाले आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ असे म्हणत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांनी 5 लाखांची मदत देण्याची घोषणा केली.