श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापाऱ्यांचे अपहरण

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय 49) यांचे अपहरण झाले असून तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहे. व्यावसायिक स्पर्धेमुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून हिरण अचानक बेपत्ता झाले असूनत्यांचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार त्यांचे भाऊ पंकज झुंबरलाल हिरण यांनी दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता हिरण नेहमीप्रमाणे आपले गोडाउन बंद करून हिशोबाच्या वह्या व रोख रक्कम घेऊन दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. अज्ञात व्यक्तींनी बेलापूर बायपास येथे त्यांची मोटरसायकल अडविली. त्यांना एका चारचाकी वाहनात बळजबरीने बसविले. वाहनात त्यांना घालून नेत असताना अनेकांनी बघितले आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत पोलिसांना गौतम हिरण यांची मोटारसायकल श्रीरामपूर बेलापूर बायपासला लावलेली आढळली. चावी,हिशोबाची कागदापत्रे आणि वह्यांची पिशवीही गाडीलाच होती. त्यामुळे पैशांसाठी अपहरण केले असावे, अशी शंका नातेवाईकांना येत आहे. त्यादृष्टीनेही बेलापूरचे पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या