कांदा महागला म्हणून कोबीचा वापर, खव्वयांमध्ये नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-5

अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20-30 रुपये किलोनी विकला जाणारा कांदा थेट 120 किलोवर पोहोचल्याने सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले होते. महागलेला कांदा हा सध्या स्वयंपाकघरातून अगदी नगण्य स्वरुपातच वापरला जात आहे. हिच परिस्थिती हॉटेल तसेच अन्न पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची झाली आहे. साधे डोसेवाले, चाट सेंटरच्या गाड्यांपासून थेट मोठ्या हॉटेलपर्यंत सगळीकडूनच कांदा हद्दपार झाला आहे. ऑनियन उत्तपा, भेळ किंवा कांद्याची भजी म्हणा यात कोबी टाकून भर टाकली जात आहे. बंगळुरूमधील काहींनी प्रसिद्ध हॉटेल्सनी त्यांच्या मेन्यूमध्ये ‘ऑनियन उतप्पा’ काढून टाकला आहे. त्यामुळे खवय्ये सध्या नाराज झाले आहेत.

अवकाळी पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे बाजारात सध्या कांद्याची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. हॉटेलमधून येणाऱ्या जेवणासोबत येणाऱ्या कांदा लिंबूमध्ये कांद्याची जागा ही आता मुळ्याने घेतली आहे. तर कोशिंबरीमध्ये कांद्याच्या जागी काकडी वापरली जात आहे. रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांमध्ये भेळ, कांद्याची भजी, डोसा यामध्ये कांद्याची जागा कोबीने घेतली आहे. यामुळे खाद्यपदार्थाची चव कमी झाल्याची नाराजी निर्माण झाली आहे