राज्यात मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राजभवनकडून पत्रक जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. याबाबत राजभवनकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक (वृत्त ) दयानंद कांबळे यांच्या नावाने जारी करण्यात आले आहे.