अंध क्रिकेटपटूंसाठी अंकिता सिंग यांची बॅटिंग

क्रिकेट जगतात आपले कौशल्य दाखवण्यासाठी महिला अंध क्रिकेटपटूंना संधी मिळणे आवश्यक आहे, असे मत दिल्लीच्या अंध महिला संघाच्या कर्णधार अंकिता सिंग यांनी व्यक्त केले. त्या क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडिया (कॅबी) आणि समर्थनम ट्रस्ट यांनी बंगळुरू येथे ‘अंध क्रिकेट’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होत्या.

अंकिता सिंग पुढे म्हणाल्या की, महिला अंध क्रिकेट संघासाठी जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. यामुळे अंध महिला क्रिकेटबाबत तळागाळात जनजागृती निर्माण होईल. तसेच अंध महिला क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या माध्यमातून चांगले उपजीविकेचे साधन प्राप्त होईल. या चर्चासत्रात क्रिकेट क्षेत्राचा मुख्य प्रवाह व अंध क्रिकेट, अंध क्रिकेटपटूंची मानसिकता, कॉर्पोरेट क्षेत्राचा अंध क्रिकेटमधील सहभाग आदी विषयांवर चर्चा झाली.

या चर्चासत्रात माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू सुजित सोमासुंदर, पूर्व महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी, कॅबी अध्यक्ष महंत जी. किवदासनवर आदी उपस्थित होते. शिवाय यावेळी कॅबीच्या संदर्भातील डॉक्युमेंटरी फिल्मही सादर करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या