वरिष्ठांच्या परवानगीविना परस्पर सीडीआर मिळविणे कॉन्स्टेबलच्या नोकरीवर बेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियमबाह्य काम करणे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या नोकरीवर बेतले आहे. वरिष्ठांची परवानगी न घेता, त्यांच्या आदेशाचे उल्लघंन करून एका गुन्ह्यात मोबाईल कंपन्यांकडून परस्पर 12 मोबाईलचे सीडीआर काढल्याप्रकरणात राजेश मोरे या कॉन्स्टेबलवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी राजेश मोरे हे वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी प्रतिनियुक्तीवर परिमंडळ-8 येथे असताना एका अपघाताच्या गुन्ह्यात त्यांनी वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच त्यांची परवानगी न घेता मोबाईल पंपन्यांशी परस्पर संपर्क साधला आणि 12 मोबाईलचा सीडीआर मिळवला. हा प्रकार समोर येताच मोरे यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. विभागीय चौकशीत राजेश मोरे यांनी परस्पर मोबाईल पंपन्यांकडून मोबाईलचे सीडीआर मिळविल्याचे सिद्ध झाल्याने सशस्त्र विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी राजेश मोरे यांना सेवेतून बडतर्फीची शिक्षा केली आहे.

कुठल्याही गुह्यात मोबाईलचा सीडीआर मिळवायचा असेल तर त्याला उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱयाची परवानगी असणे आवश्यक असते. वरिष्ठांच्या परवानगीनंतरच मोबाईल पंपन्यांशी संपर्क साधून सीडीआर मिळविला जातो, परंतु राजेश मोरे यांनी तसे न केल्याने ते दोषी असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.