नवे सुलेखन! नवी चित्रं!!

>> अच्युत पालव (सुलेखनकार)

कला नित्य नवे मार्ग दाखवत असते. या लॉकडाऊनच्या काळात सुलेखनाबरोबर लहान मुलांच्या चित्रमय जगात रमलो.

लॉकडाऊनला सुरुवात झाली तेव्हा सर्व कठीण वाटत होतं. जी गोष्ट आपल्याला गरजेची आहे आणि जी आपल्याला मिळू शकते, याचा विचार या काळात केला. याकरिता झालेल्या गोष्टींवर काही न करता काही नवीन चित्रं काढली. माझ्या मुलाने काही चित्रं काढली होती. त्या चित्रांवर नव्याने बघून त्यात नवीन काय करू शकतो याचा विचार केला. आपण जुन्या गोष्टी जशा नव्याने बघतो त्यापद्धतीने प्रयोग करायला सुरुवात केली. या काळाचा फायदा घेऊन काहीतरी नवीन काम करण्याचा निश्चय केला. काही पोलिसांसाठी काम केलं. महानगरपालिकेचे डॉक्टर, कर्मचारी, नर्सेस यांच्यासाठी काम केलं. मपाचे संदीप माळी यांच्या मदतीने तेथे काम सुरू केले.

त्यानंतर असे लक्षात आले की, एक दिवस कवी प्रवीण दवणे यांचा मला फोन आला. ते म्हणाले की, या काळात घरी असलेली लहान मुले आहेत. ती काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करायला हवं. दवणे यांनी मुलांसाठी लिहिलेल्या कवितांकरिता चित्र , कॅलिग्राफी मी केली. अशा प्रकारे स्वतःला गुंतवत राहिलो. हे सगळं करता करता मला ऑनलाइन क्लासेसची चौकशी होऊ लागली. तीही सुरू केली. 15 ऑगस्टनिमित्त हिंदुस्थानातील विविध भाषांवर आधारित कॅलिग्राफी लिपीवर आधारित वंदे मातरम् हा अनोखा कार्यक्रम सादर केला.

जग सतत बदलत राहणार. नवं-जुनं सतत होत राहणार. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हे ठरवायचं आहे की, आपल्याला कशाशी मिळतं जुळतं घ्यायचं आहे.

या काळाने मला बरंच काही शिकवलं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतोय. काळ वेगाने बदलतोय. यात माणूस पैसे वाचवायला, जेवण करायला शिकलाय, ऑनलाइन बोलायला शिकला. चित्रकार म्हणून मला भरपूर नव्या गोष्टी या लॉकडाऊनच्या काळात मिळाल्या. यातून सातत्याने काहीतरी नवं निर्माण होतंय.

आहार आणि व्यायामाच्या बाबतीत सांगायचं तर हा प्रत्येकाने आपआपल्या प्रकृतीप्रमाणे ठरवण्याचा भाग आहे. बरेच जण शासनाला दोषी ठरवतात. इतरांना दोष देऊ नये. सतत बातम्या बघूनही लोकांचं मानसिक खच्चीकरण होतं. माणूस डिस्टर्ब होतो याचाही विचार करा, असं मला वाटतं. याऐवजी कुटुंबाला वेळ देणं, आधुनिक गोष्टी शिकणं, कलेतून आनंद मिळवणं या गोष्टी शिकलो तर जीवनमरणाच्या काळात शांतपणे जगू शकू.

आपली प्रतिक्रिया द्या