कल्याण बाजार समिती निवडणूक, शिवसेना उमेदवारांची प्रचारात आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘कपबशी व अंगठी’चा गावागावात जोर पहायला मिळत आहे. शिवसेना उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी 17 मार्च रोजी मतदान होत आहे.

शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात असून भाजप आणि राष्ट्रवादीची झालेली आघाडी मतदारांना रुचलेली नाही. याचा फटका भाजप आणि राष्ट्रवादीला निवडणुकीत निश्चित बसणार आहे. याउलट शिवसेना उमेदवारांना गावोगावी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खडवली गणात आज शिवसेना उमेदवार लता भोईर यांच्या प्रचारासाठी रॅली निघाली. यामध्ये युवासेना ठाणे जिल्हा सचिव ऍड. अल्पेश भोईर, तालुकाप्रमुख वसंत लेणे, विश्वनाथ जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुषमा लोणे, मीनाक्षी जाधव, विलास मोरे, नितीन विशे, समीर शेलार आदी सहभागी झाले होते.

12 ठिकाणी मतदान
नवीन शासन नियमानुसार शेतकरी असणारी व्यक्तीच बाजार समितीचा सभासद आहे. 18 हजार सातशे सभासद मतदानासाठी पात्र आहेत. मांडा, बल्याणी, बारावे, कल्याण, निळजे, नांदिवलीतर्फे पाचनंद, फळेगाव, कुंदे, गोवेली, खडवली, टिटवाळा, बावेघर या 12 गणांमध्ये 17 मार्च रोजी 16 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 18 मार्च रोजी मतमोजणी आहे.