कॅनडाचा दणका, अमेरिकेवर लावले 50 टक्के टॅरिफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि कॅनडामध्ये व्यापारी संघर्ष वाढला आहे. अमेरिकेने कॅनडावर टॅरिफची घोषणा केल्यानंतर कॅनडनेदेखील अमेरिकेवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. युद्धजन्य स्थिती असून अमेरिकेने टॅरिफ लावून आमच्यावर हल्ला केला आहे, असे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने कॅनडावर 50 टक्के टॅरिफ लावले आहे. त्यावर संतापून कॅनडानेदेखील अमेरिकेवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली. याची अंमलबजावणी 8 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि कॅनडा दरम्यान 3 दिवस चाललेली व्यापार कराराची चर्चा अयशस्वी ठरली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मध्यरात्रीपासून कॅनडाच्या 20 अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लागू केले. मात्र अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापारी तणाव वाढला. अमेरिका जेवढे शुल्क लावेल, कॅनडाही तेवढेच प्रत्युत्तर देईल, असे मार्क कार्नी यांनी स्पष्ट केले. वाहन उद्योग, डेअरी तसेच मद्य विक्रीच्या मुद्दय़ांवरून दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरली. मार्क कार्नी यांनी सांगितले की, अमेरिकेने व्यापार चर्चेच्या शेवटच्या फेरीत अशा अटी ठेवल्या ज्या कॅनडा स्वीकारू शकत नाही.