नोटाबंदीमुळे उमेदवारांचे उत्पन्न घटले

427

निवडणुकीच्या काळात सर्वाधिक चर्चेचा विषय असतो तो उमेदवारांच्या उत्पन्नाबाबत. उमेदवारी अर्ज भरताना त्यांना आपल्या संपत्तीचे विवरणपत्रही सादर करावे लागते. यावेळी अनेक उमेदवारांच्या उत्पन्नात घट झालेली दिसली. 2014-15 आणि 2015-16 या दोन वर्षांत उत्पन्नात वाढ झाली आहे, परंतु 2016-17 या आर्थिक वर्षात उमेदवारांचे उत्पन्न एकदम घसरले आहे. याच काळात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नोटाबंदीमुळेच उमेदवारांच्या उत्पन्नात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपत्ती जाहीर करताना दरवर्षी मिळणारे उत्पन्न, स्थावर जंगम मालमत्ता आणि दरवर्षीची कमाई याबाबत सांगावे लागते. सर्वांना पाच वर्षांतील प्रत्येक आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्रातील उत्पन्नाचे आकडे द्यावे लागतात. यावेळच्या निवडणुकीत भाजप उमेदवार पराग शाह आणि पत्नीच्या संपत्तीचा आकडा 500 कोटी इतका दाखवण्यात आला आहे. 2017 साली पालिका निवडणूक लढताना शाह हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार होते. तेव्हा त्यांची संपत्ती 690 कोटी इतकी होती. दोन वर्षांत शाह यांच्या संपत्तीत तब्बल 190 कोटी रुपयांची घट झाली. 2014-15 साली त्यांनी भरलेल्या आयकर विवरणपत्रात त्यांचे उत्पन्न 9 कोटी 42 लाख इतके होते. 2015-16 साली हेच उत्पन्न 4 कोटी 10 लाखांवर आले तर 2017 साली त्यात एकदम घट होऊन ते 3 कोटींवर आले तर राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे उत्पन्न 2014-15 मध्ये 12 कोटी 41 लाख 308 रुपये इतके होते. हे उत्पन्न 2015-16 मध्ये 4 कोटी 10 लाखांवर आले. 2016-17 साली हेच उत्पन्न थेट 37 लाख 38 हजारांवर घसरले तर पुढच्याच दोन वर्षांत हेच उत्पन्न पुन्हा 3 कोटी 23 लाखांवर पोहचले. दरम्यान, कुलाब्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार्‍या भाई जगताप यांचे उत्पन्न 2014-15 मध्ये 37 लाख 92 हजार इतके होते. 2015-16 मध्ये त्यात 6 कोटी 44 लाख अशी मोठी वाढ झाली. 2016-17 साली हेच उत्पन्न थेट 36 लाख 5 हजारांपर्यंत घसरले. दोन वर्षांत त्यांचे उत्पन्न पुन्हा 51 लाख 93 हजारांवर पोहचले.

आपली प्रतिक्रिया द्या