
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड-नगर रोडवर साई भक्तांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.
बीड आष्टी तालुक्यातील पोखरी फाटा येथून सकाळी आठ वाजता साई भक्तांची इनोव्हा गाडी भरधाव वेगानं जात होती. मात्र त्याचवेळी पुलावरून गाडी खाली गेल्याने हा अपघात घडला. या अपघातात आठ जण जखमी असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
summary: car accident on jamkhed nagar road, 8 injured





























































