
देशातील वाहन विक्रीमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये वार्षिक आधारावर 20.36 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 18 लाख 82 हजार 71 वाहनांची, तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 17 लाख 70 हजार 181 वाहनांची विक्री झाली होती.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (एफएडीए) वाहन विक्री अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार वाहन विक्रीमध्येही तीनचाकी वाहनांची विक्री अधिक झाली आहे. तीनचाकी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक 48.58 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशभरात एकूण एक लाख दोन हजार 426 तीनचाकी वाहनांची विक्री झाली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात 68 हजार 937 तीनचाकी वाहनांची विक्री झाली होती. त्याच वेळी व्यावसायिक विभागामध्ये वार्षिक 4.87 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशात 80 हजार 804 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. 22 सप्टेंबरमध्ये 77 हजार 54 वाहनांची विक्री झाली. मारुती सुझुकीने सर्वाधिक 1.39 लाख कार विकल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात पंपनीने 1.11 लाख कार विकल्या होत्या.
























































