
मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा छळ करण्यात आला. तसेच माहेरी जाऊन तीन लाख रुपये आणायला सांगितले. पैसे आणले नाहीत म्हणून पत्नीला सोडून दुसरे लग्न केल्याप्रकरणी अहमदपूर येथे तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आफरीन फिरदौस खैसर शेख या खाजगी शाळेत सहशिक्षीका म्हणून काम करणाऱ्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचे लग्न वडीलांच्या बहिणीच्या मुलाशी झाले होते. लग्नानंतर थोडे दिवस चांगले नांदवले. दोन मुली झाल्यानंतर तुला मुलगा होत नाही याकारणासाठी छळ करण्यात आला. नोकरीसाठी 5 लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैशांसाठीही छळ करण्यात आला. त्यामुळे वडिलांनी दोन लाख रुपये दिले. त्याने नवऱ्याचे समाधान झाले नाही. सुट्टीत माहेरी गेल्यानंतर पुन्हा सासरी नांदण्यासाठी आणले नाही. तुला मुलगा होत नाही, माहेरी जाऊन तीन लाख रुपये आणले नाहीस, तुला फक्त 5 हजार रुपये पगार मिळतो, मी 20 हजार पगार मिळणाऱ्या नसरीन हिच्याशी लग्न केले आहे. आता तुझी मला गरज नाही असे नवऱ्याने सांगितले. आपल्याला न सांगता अंधारात ठेवत दुसरे लग्न करुन फसवणूक केल्याची तक्रार महिलेने केली आहे. तक्रारीनुसार तक्रारदार महिलेचा नवरा खैसर बाबर शेख, सासरे शेख बाबर महबूब आणि सासू सईदाबानो शेख बाबर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































