तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा दुरुपयोग, फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी लातूर मध्ये 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गिरवलकर नगर येथे राहणाऱ्या शेख अन्सार मन्सूर यांनी तक्रार दाखल केली. प्रशांत भागवत ईरलापल्ले यांच्या कडून त्याने 100 दिवसात परत करण्याच्या अटीवर 6 लाख रुपये घेतले होते. त्यासाठी तारण म्हणून जनता सहकारी बँक लातूर शाखेचे धनादेश क्रमांक 290498 ते 290542 स्वाक्षरी करून कोरे दिलेले होते. सोबतच 100 रुपयांचा कोरा बाॅन्ड पेपर दिलेला होता. सहा लाख रुपये परत केले परंतु तारण म्हणून दिलेले चेक, बाॅन्ड त्यांनी परत दिलेच नाहीत.

प्रशांत भागवत ईरलापल्ले, पिराजी माणिक मेकले, चेतन तुकाराम आकनगिरे, हरिओम शरदराव भगत यांनी संगनमत करून त्याचा दुरुपयोग केला. 10 लाख रुपये येणे आहे अशी नोटीस त्यांनी पाठवून दिली. तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.