समीर वानखेडे अडचणीत; जात पडताळणी समितीकडून 14 डिसेंबरला होणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भातील तक्रारीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आलेल्या तक्रारीवरून वानखेडे यांना 14 डिसेंबरला चौकशीस हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार मुंबई जिल्हा जात पडताळणी समितीकडे केली होती. यासंदर्भात आज समितीने कागदपत्रे घेऊन तक्रारदाराला कार्यालयात बोलविले होते. त्यानुसार, तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते यांनी समितीसमोर कागदपत्रे सादर केली. याप्रकरणात प्रथमदर्शनी समितीने कागदपत्रे पाहून चौकशी करण्याचे मान्य करत दोघांनाही 14 डिसेंबरला समितीपुढे पुढील चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे.