पिंपरी-चिंचवड येथे सुनेत्र योजनेंतर्गत मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठी नोंदणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नोंदणीकृत विमा कामगार तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, मोहननगर, चिंचवड येथे सुनेत्र योजनेअंतर्गत मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी नोंदणी सुरू आहे.

मोतीबिंदु असलेल्या रुग्णांची नोंदणी करून शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामार्फत नियोजन करण्यात आले आहे. विमा कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राकावि. सोसासटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.