संदीप सिंह आणि भाजपचे कनेक्शन तपासा, गृहमंत्री सीबीआयला विनंती करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याचा मित्र संदीप सिंह याची सीबीआय चौकशी करणार आहे. त्यावेळी संदीप आणि भाजपचे काय कनेक्शन आहे याचाही तपास करावा अशी विनंती सीबीआयला करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

संदीप सिंह याचे भाजपशी जवळचे संबंध असल्याचा दावा काँग्रेसने एका वृत्ताच्या हवाल्याने केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगली. संदीप याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला होता. याबाबत गृहमंत्री देशमुख म्हणाले, संदीप सिंह आणि भाजपचा काय संबंध आहे याची चौकशी करण्यात यावी अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. याची दखल घेऊन संदीपची चौकशी करण्याची विनंती सीबीआयला करणार आहे.