
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सीबीएसई बोर्डाच्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. केरळ येथील भावना एन. शिवादास ही विद्यार्थिनी परीक्षेत देशात पहिली आली असून तिला 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. केरळमधले 13 विद्यार्थी 500 गुणांपैकी 499 गुण मिळवून बोर्डात पहिले आले आहेत.
देशभरात एकूण 91.1 टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली असून त्यात त्रिवेंद्रमने सर्वाधिक म्हणजे 99.85 टक्के इतकी आकडेवारी नोंदवली आहे. त्याखालोखाल चेन्नई असून तिथे 99 टक्के तर अजमेर येथे 95.89 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 25 विद्यार्थी असून या सर्वांना 498 गुण मिळाले आहेत. तर 59 विद्यार्थी तृतीय क्रमांकावर असून त्यांना 497 गुण मिळाले आहेत. या परीक्षेत तब्बल 12.78 टक्के विद्यार्थ्यांनी 90हून अधिक गुण मिळवले आहेत.
Bhavana N Sivadas from Kerala is the all India topper in CBSE Class-10th Exams with 499 marks out of 500. https://t.co/wInuOIpNH5
— ANI (@ANI) May 6, 2019

























































