
ध्वज हरिया सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक 2025 स्पर्धेमध्ये अरुण अग्रवालवर 4-0 असा सहज विजय मिळवला. सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉल येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत हरियाने धमाकेदार सुरुवात करताना 150 चा ब्रेकसह 150-अप फॉरमॅटमध्ये पहिली फ्रेम जिंकली, जी सात फ्रेम्समधील सर्वोत्तम ठरली. दुसऱया फ्रेममध्ये त्याने 66 आणि 85 तसेच तिसऱ्यामध्ये 138 गुणांचे ब्रेक मिळवले. त्यानंतर चौथ्या ब्रेकमध्ये 64 गुणांच्या ब्रेकसह सामना संपवला. त्याने अग्रवालला फारशी संधी मिळाली नाही. बाजूच्या टेबलवर, आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियन ध्रुव सितवलाने नलिन पटेलला 4-0 असे पराभूत केले. सितवालाने पहिल्यामध्ये 74 आणि दुसऱयामध्ये 87 चे ब्रेक घेतले. त्याने चौथ्या फ्रेममध्ये 110 गुणांचा ब्रेक घेऊन आपला विजय निश्चित केला.
सिद्धार्थ पारिखनेही सर्वोत्तम खेळ करताना रोविन डिसूझाला 4-0 असे रोखले. पारिखने 98 (पहिली फ्रेम), 74 (दुसरी फ्रेम), 97 (तिसरी फ्रेम) आणि 149 (चौथी फ्रेम) असे चांगले ब्रेक घेतले आणि विजयाचा सोप्पा विजय नोंदवला.