सेलिब्रिटी तरुणीने लैंगिक अत्याचार केला, व्हिडीओद्वारे तरुणाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका सेलिब्रिटी तरुणीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. यूट्युबवर एक व्हिडीओ प्रसारित करून त्याने हा आरोप तिच्यावर केला आहे.

या तरुणाचं नाव जॅक राईट असं आहे. जॅकने सोशल मीडिया स्टार असलेल्या सिएना गोमेज या तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. जॅक हा एक अमेरिकन टिकटॉकर आहे. दोघांचंही वय 18 वर्षं आहे. जॅकने एक व्हिडीओ शेअर करून सिएनावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

सिएनाने आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं जॅकचं म्हणणं आहे. सिएनाने 2021च्या मे महिन्यात आपला गैरफायदा घेतला, असं जॅकचं म्हणणं आहे. एका पार्टीत आपण शुद्धीत नसताना तिने माझ्या मर्जीविरुद्ध माझ्या शरीराला स्पर्श केला. मी बेशुद्ध पडलेलो असताना तिने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेचा एक व्हिडीओ माझ्या मित्राने काढला आहे. त्याने तिला असं करण्यापासून रोखलं देखील होतं, असा दावा जॅकने केला आहे.

एकदा तिने माझे कपडे फाडून माझ्यावर अत्याचार केले होते. जरी मी सिएनाला लहानपणापासून ओळखत असलो तरी तिचं हे वागणं माझ्यासाठी धक्कादायक होतं, असंही जॅकचं म्हणणं आहे. दुसरीकडे सिएनाने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. जॅक असे आरोप निव्वळ माझी बदनामी करण्यासाठी करत आहे. जोवर आमच्यात चांगले संबंध होते, तोपर्यंत काहीही आरोप झाले नाहीत. पण जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हापासून हे आरोपांचं सत्र सुरू झाल्याचं प्रत्युत्तर सिएनाने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by jack wright (@jack.wright21)