केंद्र सरकारने आयात कर वाढवला! सोने महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात आता सोने महागणार आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील बेसिक इंपोर्ट टॅक्स 7.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के एवढा वाढवला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ होणार आहे. सरकारने सोन्याची आयात कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे. त्यामुळे आयात कमी करून व्यापारातील तूट भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.