
2022 ची बीएमसी, 2024 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीची तयारीबरोबर मुंबई महापालिका हे भारतीय जनता पक्षाचे नव्या वर्षातले लक्ष्य आहे. यावेळी थेट दिल्लीहून मुंबईवर लक्ष दिले जाईल असे सांगत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपची पुढची रणनीती उघड केली. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणे हा आमचा राजकीय मुद्दा नाही. हा मुद्दा निवडणुकीचा नाही, तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते आधी हटवा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.






























































