मध्य रेल्वेच्या स्थानकांवर आधार कार्ड केंद्राची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे प्रवाशांना आता लोकल पकडण्याबरोबरच आपल्या आधार कार्ड संबंधिची सर्व कामे रेल्वे स्थानकात करता येणार आहेत. मध्य रेल्वेच्या स्थानकांवर आता प्रवाशांना आधार कार्ड संबंधी सर्व प्रकारच्या सेवा मिळणार आहेत. पुणे स्थानकात स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आधार कार्ड केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तशाच प्रकारचे सेंटर आता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, नागपुर सारख्या मोठ्या स्थानकांत सुरू करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांना आता नवीन आधार कार्ड किंवा आधीच्या आधार कार्डात सुधारणा किंवा दुरूस्ती करायची असेल तर खूपच कठीण समस्येला सामोरे जावे लागत असते. परंतु प्रवासी आता रेल्वे स्थानकावर आधारकार्ड काढू शकतील नवीन आधार नोंदणी तसेच लहान मुलांचे आधार बायोमेट्रिक वगैर करण्यासाठी इकडे तिकडे फिरण्याची गरज नसून रेल्वे स्थानकांवर हे काम मोफत होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

मोबाईल नंबर बदलणे, इतर दुरूस्तीसाठी फॉर्म भरावा लागणार असून नियमाप्रमाणे 50 रुपये आकारले जातील. पुणे स्थानकात आधार केंद्र सुरू झाले असून लवकरच सीएसएमटीत तसेच नागपूर स्थानकात ही सुविधा सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले.